शेकडो वर्षाची परंपरा : यावलला उद्या श्री बालाजी रथोत्सव

खंडोबा महाराजांच्या बारागाड्या देखील ओढल्या जाणार


A Tradition Spanning Centuries: Shri Balaji Chariot Festival Tomorrow in Yawal यावल (1 एप्रिल 2026) :l शेकडो वर्षाची पंरपरा असलेल्या श्री बालाजी रथोत्सव यावल शहरात गुरुवार, 2 एप्रिलला सायंकाळी साजरा केला जाणार आहे. सायंकाळी श्री महर्षी व्यास मंदिरासमोरील हडकाई- खडकाई नदी पात्रात रथाची शास्त्रोक्त पध्दतीने मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात येईल व रथोत्सवाला सुरवात होईल. रात्रभर शहरातून रथ मार्गस्त होत शुक्रवारी सकाळी समारोप होणार आहे. दरम्यान, चोपडा रोडावरील बडगुजर समाजाच्या वतीने श्री खंडोबाची यात्रेनिमित्त बारागाड्या देखील ओढण्यात येणार आहेत.

शेकडो वर्षांची परंपरा
शहरात शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या श्री बालाजी रथोत्सव गुरुवारी साजरा करण्यात येणार आहे. या निमित्त शहरात मोठ्या प्रमाणात रथोत्सवात सहभागी होण्यासाठी भाविक वर्ग उपस्थित राहतो तर हडकाई नदी पात्रात यात्रा देखील भरते. एकीकडे या रथाचे पूजन करून महषी व्यास मंदिरासमोरील नदी पात्रातून नगरपालिकेमार्गे डांगपूरा मस्जिदीजवळ रथ दाखल होतो तर दुसरीकडे चोपडा रस्त्यावर असलेल्या राज्य विद्युत मंडळाच्या सबस्टेशनपासून ते नदीच्या शहराकडे जाणार्‍या मार्गा दरम्यान बारागाड्या ओढण्यात येतात.


पोलिसांचा असेल बंदोबस्त
बडगुजर समाजाच्या वतीने या गाडया ओढल्या जातात. यात देखील मोठ्या प्रमाणावर भाविकांची उपस्थिती राहते. बारागाड्या ओढल्यानंतर रथ पुढे चावडी, मेनरोड, बोरावल गेट, देशमुख वाडा, लक्ष्मीनारायण मंदिरमार्गे, रेनुका देवीच्या मंदिराजवळ शुक्रवारी पहाटे दाखल होईल व तेथे रथोत्सवाची सांगता होईल. या रथोत्सवाच्या मार्गाचे नगर परिषदेच्या वतीने डागडूजी देखील करण्यात येत आहे. गावात रथोत्सवानिमित्ताने डीवायएसपी अनिल बडगुजर, पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त लावला जाणार आहे.

भाविक ओढतात रथ
सुमारे 12 टन वजनाच्या या रथाला भाविकवर्ग ओढतो तर अतिशय शिताफीने रथाच्या चाकांना मोगरी लावत कसबपुर्णरित्या वळविण्यात येते व या रथा सोबत भालदार, चोपदार मंडळीं देखील असते. शहरात सर्वत्र रथाचे पुजन व स्वागत अनेक ठिकाणी केले जाते.रात्रभर शहरात भाविकांसाठी यांत्रेची मोठी पर्वणी असते.

असा आहे रथोत्सवाचा इतिहास
माजी नगराध्यक्ष चंद्रकांत देशमुख यांचे आजोबा कै. पांडूरंग धोंडू देशमुख व सहकार्‍यांनी सन 1914 मध्ये रथोत्सव सुरू केला होता.त्या काळात श्री बालाजी महाराजांची प्रतिमा आरूड असलेला रथ रामजी मिस्त्री विनामुल्य करून दिला होता. पुजारी म्हणुन वासुदेवबाबा बियाणी, राजाभाऊ नागराज, भैय्याजी अग्नीहोत्री नंतर 1973 ते 2006 या काळात रमेशशास्त्री बियाणी,नारायणराव बियाणी, बलवंत जोशी व 2006 नंतर आजवर महेश बियाणी, राजु बियाणी व सुनिल जोशी पुजारी म्हणुन काम पाहतात.

चोख पोलिस बंदोबस्त
बारागाड्या ओढतांना त्यांचा समारोप डांगपुरा येथे मशिदीजवळ होतो तर वेगाने येणार्‍या बारागाड्या प्रसंगी मशिदीया भिंतीपर्यंत येतात तेव्हा या ठिकाणी अडचण होवू नये म्हणून पोलिस बंदोबस्त लावण्यात येणार आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !