भुसावळात श्री हनुमान जन्मोत्सव उत्साहात
भुसावळ (3 एप्रिल 2026) : श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त भुसावळातील वरणगांव रोडवरील रामायण नगरातील शिवालय, श्री संकट मोचन हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सवानिमित्त सकाळी सहा वाजता हनुमानजीच्ंया मुर्तीला शेंदूर लावून अभिषेक व पूजा करण्यात आली. विविध प्रकारचे फळे नैवेद्य व फुलहार भाविकांनी हनुमानजींना वाहिले. सकाळपासूनच मंदिरात भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी केली.
भाविकांची दर्शनार्थ गर्दी
शहरातील भाविकांनी हनुमान चालिसा तसेच मंत्रोपचार देखिल पठण केले.मंदिर परिसरात रांगोळ्या टाकून सुशोभीकरण करण्यात आले होते. दिवसभर मंदिर संस्थानतर्फे भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला तसेच शनिवार, 4 रोजी संध्याकाळी पाच वाजेपासून सुंदर कांड पाठ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे ओम शिवालय बहुउद्देशीय संस्था, रामायण नगर सार्वजनिक उत्सव मंडळ,रामायण नगर महिला मित्र मंडळ व तेथील भक्तांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत भाविकांची मंदिरात व परिसरात गर्दी दिसून आली. यशस्वीतेसाठी प्रमोद सिंग, सुभाष कुळकर्णी, हरिष शर्मा, डॉ.सुधीर ओझा, ब्रिजेश कुशवाह, विक्रांत कुशवाह, राहुल तावरे यांनी परिश्रम घेतले.








