रावेर-यावल तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा : आमदार अमोल जावळे यांचे पंचनाम्याचे आदेश
रावेर (2 एप्रिल 2026) : रावेर व यावल तालुक्यात गुरुवारी संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी वार्यासह झालेल्या पावसाने मोठा तडाखा दिला. कापणीला आलेल्या शेकडो हेक्टरवरील केळी बागांचे नुकसान झाले असून गहू व मक्याच्या पिकांनाही मोठा फटका बसला आहे.
केळी उत्पादकांना अस्मानी-सुलतानी संकटाचा फटका
गेल्या काही दिवसांपासून रावेर-यावल परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. मात्र आज झालेल्या वादळी पावसाने अक्षरशः कहर केला. जोरदार वार्यामुळे कापणीला आलेल्या केळी बागा मोठ्या प्रमाणावर मोडून पडल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकर्यांपुढे गंभीर आर्थिक संकट निर्माण झाले आहे.








