शंभर वर्षांची परंपरा : मुक्तळला हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात


बोदवड (3 एप्रिल 2026) : बोदवड तालुक्यातील मुक्तळला सुमारे शंभर वर्षांपेक्षा अधिक काळापासून श्रीरामनवमी ते हनुमान जयंती पर्यंत मोठा उत्सव साजरा करण्याची परंपरा आजतागायत अविरतपणे सुरू आहे. स्व. प्रभाकर गोपाळ जोशी यांनी ही परंपरा सुरू केली होती.

चार दिवस नाटकांची मेजवाणी
रामनवमीला रामजन्म कथा, रामजन्म होऊन हा उत्सव सुरू होतो. यानंतर श्रीराम प्रासादिक नाट्य मंडळाद्वारे सलग चार दिवस वेगवेगळी नाटके सादर केली जातात. यात गावातील लोक पुरुष व स्त्री पात्र घेतात. हनुमान जयंती च्या आदल्या दिवशी दशावताराचे सोंग घेतली जातात. यात आता सकाळी पाच वाजता नृसिंह अवताराचे सोंग घेतले जाते. आधी हे सोंग स्व. प्रभाकर जोशी घेत असत. त्यानंतर आत्माराम पवार व आता विठोबा पवार घेतात. यावर्षी कुंकवाचा टिळा व इतर विषयावर नाटके सादर केली गेली. आसपास च्या गावचे लोक आवर्जून हे सर्व बघण्यासाठी येत असतात. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जन्म व दुपारी पालखी सोहळा होऊन उत्सवाची सांगता होते.



नाट्यमंडळाचे सदस्य डॉ.ब्रिजराज जैन, डॉ.रमेश जोशी, सुनील पाटील, रामदास पाटील, दरबार पाटील, नंदू पाटील, बंडू पाटील, चिमा जोशी आदींनी परिश्रम घेवून उत्सव साजरा केला.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !