भुसावळात बारागाड्यांचा उत्साह : रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलले


Baragadi Enthusiasm in Bhusawal : Streets Teem with Crowds of Devotees भुसावळ (3 एप्रिल 2026) : भुसावळ शहरात बुधवारी सायंकाळी भाविकांच्या अपूर्व उत्साहात बारागाड्या ओढण्यात आल्या. जामनेर रोडवरील शनि मंदीर ते अष्टभुजा देवीच्या मंदीरापर्यत सुमारे 800 मीटर अंतरातील बारागाड्या ओढण्याचा सोहळा पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. संध्याकाळी 6.47 वाजता सोहळ्याला सुरूवात झाल्यानंतर 6.56 वाजता बारागाड्या अष्टभुजा देवीच्या मंदिराजवळ पोहोचल्या.

रस्त्याच्या दुतर्फा गर्दी
शहरातील जामनेर रोडवरील शनि मंदिर ते अष्टभुजा देवीच्या मंदीरापर्यत बारागाड्या ओढण्याची परंपरा आहे. बुधवारी सायंकाळी 6.47 सुमारास बारागाड्या ओढण्यास सुरूवात झाली. भगत म्हणून आकाश नाले होते. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त बारागाड्यांसाठी तैनात होता. पोलिस निरीक्षक राहुल वाघ व सहकार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवला. बारागाड्या पहाण्यासाठी शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर जामनेर रोडवर गर्दी केली.



अन्य लेनमधून वाहतूक वळवली
बारागाड्या ओढल्या जाणार असल्याने जामनेर रोडवर जळगावकडून येणार्‍या मार्गावर शनि मंदिरापासून सुरूवात होणार असल्याने शहरात येणारे सर्व वाहने ही बाजूच्या लेन मधून वळविली होती, यामुळे शनि मंदिर ते अष्टभुजा देवीच्या मंदिरापर्यतची वाहतूक एकाच लेन मधून येणारी व जाणारी होती. यावेळी शहर वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी येथे नियुक्त होते. बॅरेकेट लावून रस्ता बंद करण्यात आला. शहर वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक उमेश महाले यांच्यासह त्यांचे कर्मचारी वाहतूक नियंत्रीत करीत होते.

रथाचे भाविकांनी घेतले दर्शन
जामनेर रोडवरील अष्टभुजा देवीचा रथही जागेवरच दहा पावले ओढून नेला जात असतो. यावेळी भाविकांनी रथाची पूजा केली. देवीचे दर्शन घेण्यासाठी मंदीरात भाविकांची गर्दी होती, तसेच रथाचे दर्शन घेण्यासाठी सुध्दा भाविकांनी गर्दी केली.. विजय ठक्कर यावेळी उपस्थित होते. सायंकाळी मंदीरापासून पालखीची मिरवणूक काढण्यात आली होती, ही मिरवणूक अष्टभुजा देवी मंदीर, नृसिंह मंदीर, विठ्ठल मंदीर , गांधी चौक, मरीमाता मंदीर, आठवडे बाजार, गंगाराम प्लॉट भागातून पुन्हा अष्टभुजा देवीच्या मंदीराजवळ पालखीची मिरवणूकीचे विसर्जन झाले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !