लोकमान्य टिळक टर्मिनस-धनबाद दरम्यान नवीन साप्ताहिक एक्सप्रेसचा शुभारंभ
भुसावळ (6 एप्रिल 2026) : मध्य रेल्वेद्वारा प्रवाशांच्या सुविधेसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस-धनबाद दरम्यान नवीन साप्ताहिक एक्सप्रेस सुरू करण्यात आली आहे. गाडी क्रमांक 13380 ही 08 एप्रिल 2026 पासून प्रत्येक बुधवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 4.55 वाजता सुटेल आणि तिसर्या दिवशी धनबाद येथे आठ वाजता पोहचेल.
गाडी क्रमांक 13379 ही 6 एप्रिलपासून सोमवारी धनबाद येथून 11 वाजता सुटेल आणि तिसर्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे 1.40 वाजता पोहोचणार आहे.


या गाडीला कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, इटारसी, पिपरिया, नरसिंगपूर, जबलपूर, कटनी साऊथ, खन्ना बनजारी, बेओहारी, बरगवां, सिंगरुळी, ओबरा डैम, रेनूकूट, गरवा रोड, डाल्टनगंज, लतेहार, टोरी, खलारी, पत्रातू, रांची रोड, बाकरा रोड़, चंद्रपूरा, कत्रासगढ येथे थांबा देण्यात आला आहे. या गाडीला दोन वातानुकूलित द्वितीय, दोन वातानुकूलित तृतीय, सहा वातानुकूलित तृतीय इकॉनॉमी, सहा शयनयान श्रेणी, चार सामान्य द्वितीय, आणि दोन जनरेटर डबा असेल.





