सावद्याच्या माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा ताराबाई वानखेडे यांचे निधन : उद्या अंत्ययात्रा
सावदा (6 एप्रिल 2026) : सावदा शहरातील प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा ताराबाई गजाननराव वानखेडे (78) यांचे सोमवार, 6 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा मंगळवार, 7 रोजी सकाळी नऊ वाजता संभाजी चौकातील राहत्या घरापासून निघणार आहे.
पहिल्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा
ताराबाई वानखेडे यांनी सावदा पालिकेत नगरसेविका, उपनगराध्यक्ष तर सन 2001 साली प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा म्हणून निवडून येण्याचा मान मिळवला. त्यांनी आपल्या कार्यकाळात शहरविकासासाठी विविध योजना आणत मोठे कार्य केले व आपल्या कार्याचा ठसा उमटविला. सामाजिक व धार्मिक कार्यात नेहमी त्या अगे्रसर असत.


त्या शेखर गजाननराव वानखेडे, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक राजेश गजाननराव वानखेडे, चारुदत्त गजाननराव वानखेडे यांच्या मातोश्री तर नगरसेविका रेखा राजेश वानखेडे यांच्या सासू व नगरसेविका सीमरन राजेश वानखेडे यांच्या आजी होत.





