भुसावळात 12 एप्रिल रोजी महिलांसाठी इक्वॅलिटी रन
डॉ. अर्चना काबरा यांची सदिच्छादूत म्हणून निवड
Equality Run for Women on April 12 in Bhusawal भुसावळ (6 एप्रिल 2026) : भुसावळ स्पोर्ट्स अॅण्ड रनर्स असोसिएशनने ’बिसारा लेडीज इक्वॅलिटी रन 2026’ या धाव स्पर्धेचे आयोजन रविवार, 12 रोजी केल आहे. रेल्वे क्रीडांगणावर ही स्पर्धा होईल. 3.5 ने आणि 10 किमी अशा विविध गटांमध्ये महिलांना सहभागी होता येईल. 5 व 10 किमी गट टाइम्ड रन स्वरूपात होईल.
या स्पर्धेसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमासाठी डॉ. अर्चना काबरा यांची स्पर्धेच्या सदिच्छादूत म्हणून निवड करण्यात आली.
भुसावळ येथील लेडीज इक्वेलिटी रन 2026 ही केवळ धाव स्पर्धा नसून आरोग्य, आत्मविश्वास, तंदुरुस्ती आणि समानतेची जाणीव निर्माण करणारा प्रेरणादायी उपक्रम आहे, असे समन्वयिका डॉ.नीलिमा नेहेते व डॉ.चारुलता पाटील म्हणाल्या.







