निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत भुसावळातील के.नारखेडे विद्यालयाचा तृतीय क्रमांक
भुसावळ (7 एप्रिल 2026) : राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान क्षमता विकसित व्हाव्या, यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत निपुण महाराष्ट्र अभियान राज्यभर राबवले जात आहे. याच अभियानाअंतर्गत डिसेंबर 2025 ते मार्च 2026 या कालावधीत महाराष्ट्रातील इयत्ता पहिली ते पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांची दरमहा निपुण महाराष्ट्र पवर ऑनलाईन चाचणी परीक्षा घेण्यात आली. यातील मार्च 2026 या महिन्यात घेण्यात आलेल्या निपुण चाचणीमध्ये के. नारखेडे विद्यालयाने भुसावळ तालुक्यातून तृतीय क्रमांक मिळवला. यानिमित्ताने सोमवार, 6 रोजी शहरातील पु. ग. बर्हाटे माध्यमिक विद्यालयात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संगीता अडकमोल यांचा भुसावळातील प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी संजय सावकारे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
यावेळी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी किशोर एन.वायकोळे, अन्य अधिकारी, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे या संस्थेचे ऑनररी जॉईंट सेक्रेटरी प्रमोद नेमाडे उपस्थित होते. निपुण महाराष्ट्र कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील शिक्षक एम.के.सुरवाडे, एम.आर.सोनवणे, आर.आर.भारंबे, एस.एस.तायडे, जे.डी.ठोसरे, एच.व्ही.पाटील, डी.पी.जावळे, एस.एस.तळेले या इयत्ता पाचवीच्या सर्व वर्ग शिक्षकांनी व इयत्ता पाचवीला मराठी आणि गणित शिकविणार्या सर्व शिक्षकांनी कठोर मेहनत घेतली.

विद्यालयाने निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत भुसावळ तालुक्यातून तृतीय क्रमांक प्राप्त केल्यामुळे संस्थाध्यक्ष, डॉ.मकरंद एन.नारखेडे, सेक्रेटरी पी.व्ही.पाटील, संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापिका संगीता अडकमोल, विद्यालयाचे पर्यवेक्षक एस.एल.राणे, एस.पी.पाठक यांनी यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले.






