भुसावळात मेजर रॉबर्ट गील स्मृतीदिनानिमित्त 10 रोजी सामूहिक प्रार्थना सभा


भुसावळ (8 एप्रिल 2026) : शहरात मेजर रॉबर्ट गील स्मृतीदिनानिमित्त 10 रोजी सामूहिक प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले आहे. रेल्वे स्कूलचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ.सतीश कुलकर्णी यांनी ‘शब्दबद्ध केलेल्या अजिंठ्याची गाथा चुकवेल काळजाचा ठोका’

हे मेजर रॉबर्ट गिल साहेब यांच्या जीवनावर आधारित भावनिक गाण्याचे क्यूआर कोडद्वारे विमोचन केले जाणार आहे.


पोवाड्याचे होणार सादरीकरण
यावेळी प्रसिद्ध शाहिर विनोद ढगे यांच्या पहाडी आवाजात पोवाडा सादरीकरण तसेच सेंट्रल रेल्वे स्कूलच्या संगीत शिक्षिका स्मिता कुलकर्णी त्यांच्या मधूर आवाजात मेजर जनरल रॉबर्ट गील यांच्यावर आधारीत गीताचे सादरीकरण करण्यात येईल.

मेजर जनरल रॉबर्ट गील यांच्या स्मृती दिनानिमित्त अजिंठा या विषयावर चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात येईल. जळगावचे सेवानिवृत्त कलाशिक्षक राजू बाविस्कर यांच्याकाळ्या ‘निळ्या रेषा’ या आत्मचरित्राला अतिशय मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाल्याने त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

शहरातील कला शिक्षक, कला प्रिय रसिकांनी शहरातील भुसावळ रेल्वे हॉस्पिटल समोरील सेंट.पॉल चर्चमध्ये शुक्रवारी सकाळी दहा वाजता उपस्थिती द्यावी, असे आवाहन व्हीएफ आर्टीस्ट व्हिजन फाउंडेशनतर्फे
राजेंद्र जावळे यांनी केले आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !