भुसावळात बीसारा लेडीज एक्वालिटी रन स्पर्धेसाठी टी-शर्ट व पदक अनावरण सोहळा उत्साहात


भुसावळ (9 एप्रिल 2026) : बहुप्रतिक्षित बीसारा लेडीज एक्वालिटी रन या महिला धावस्पर्धेच्या पार्श्वभूमीवर स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेल्या अधिकृत टी-शर्ट व आकर्षक पदकाचे अनावरण उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

स्पर्धेचे पदक व टी-शर्टचे अनावरण कार्यक्रमाचे प्रायोजक माय फिटनेस जिमचे संचालक प्रमोद धनगर, रॉयल लॉन्सचे संचालक डॉ. मेहफूझ अली तसेच कुकरेजा सुपर शॉपीचे संचालक संजय कुकरेजा, नूतन फालक, सहभागी धावपटू डॉ. सुवर्णा गाडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.


प्रसंगी संस्थेचे प्रमुख प्रवीण फालक, कार्यक्रमाच्या समन्वयिकाद्वय डॉ. निलिमा नेहेते व डॉ.चारुलता पाटील तसेच संस्थेचे विश्वस्त ब्रिजेश लाहोटी, प्रवीण वारके व प्रवीण पाटील, स्वाती फालक, किर्ती मोटळकर , गरिमा न्याती, सायली बेंडाळे आदी महिला धावपटू देखील उपस्थित होत्या.

सुरुवातीपासून सर्व 15 प्रशिक्षण सत्रांमध्ये नियमित सहभाग घेतल्याबद्दल पुष्पा तिवारी,मनीषा सिंह, सारंग चौधरी, प्रवीण पाटील यांचे विशेष कौतुक करण्यात आले. यासोबतच बाल सहभागींचाही गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्वाती फालक, वर्षा वाडिले, सुयश न्याती यांचे सहकार्य लाभले.

या अनावरण सोहळ्यामुळे आगामी 12 एप्रिल 2026 रोजी रेल्वे स्पोर्ट्स ग्राउंड, भुसावळ येथे होणार्‍या धावस्पर्धेबाबत उत्सुकता अधिकच वाढली आहे. महिलांमध्ये आरोग्य, फिटनेस, आत्मविश्वास आणि समानतेचा संदेश पोहोचविण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धेत 3 किमी, 5 किमी आणि 10 किमी अशा विविध गटांचा समावेश असून, त्यापैकी 5 किमी व 10 किमी गटांना टायमिंग रन म्हणून विशेष महत्त्व देण्यात आले आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !