प्रवाशांना दिलासा : जळगाव येथून कोळन्हावीमार्गे यावल रात्री बस सुरू
Relief for Passengers: Night Bus Service Launched from Jalgaon to Yawal via Kolhanavi यावल (14 एप्रिल 2026) : जळगाव येथून विदगावमार्गे कोळन्हावीकडून यावल येणारी रात्रीची 9.20 ची शेवटची बस ही गेल्या काही वर्षांपासून बंद करण्यात आली होती. ही बस सेवा बंद झाल्यामुळे मुंबई, सुरत ईथून येणार्या प्रवाशांना प्रचंड अडचण निर्माण होत होती. प्रवाशांनी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी तातडीने याबाबत यावल आगार प्रमुखांना ही बस सेवा पूर्वत सुरू करण्याच्या सूचना करताच बंद बस सेवा आता पुन्हा सुरू करण्यात आल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
प्रवाशांची गैरसोय टळली
जळगाव येथून यावल येण्यासाठी पूर्वी रात्री 9 वाजून 20 मिनिटांची शेवटची बस होती. ही बस विदगाव-कोळहावी-डांभुर्णी-किनगाव मार्गे यावल यायची मात्र कोरोना काळानंतर बस सेवा ही बंद करण्यात आली होती. बस सेवा बंद झाल्यामुळे मुंबई येथून यावल तालुक्यातील प्रवासी जे रात्री उशिरा परत येत होते.

गुजरात राज्यातील सुरत येथून जे प्रवासी रात्रीच्या रेल्वेने परत येत होते त्यांना रात्री नऊ वाजेनंतर बसत नव्हती व त्यांचे प्रचंड हाल व्हायचे. यावल तालुक्यातील प्रवासी वर्गाने आपली व्यथा चोपडा आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्याकडे मांडल्यानंतर त्यांनी यावल आजाराचे व्यवस्थापक दिलीप महाजन यांच्याकडे रात्री 9.20 ची बस पूर्ववत सुरू करण्याच्या सूचना केल्या. ही बस सेवा ही पूर्ववत सुरू करण्यात आल्याने यावल तालुक्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ही बस आता जळगाव येथून दररोज रात्री 9 वाजून 20 मिनिटाला विदगाव, कोळन्हावी, डांभूर्णी, किनगाव मार्गे यावलला येणार आहे. या बस सेवेचा लाभ प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन यावल आगाराचे व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी केले आहे.


