यावल शहरात मिरवणुकांनी वेधले लक्ष : महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात
यावलला जयंती उत्सव समितीतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन
Processions Capture Attention in Yawal City: Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Celebrated with Great Enthusiasm यावल (15 एप्रिल 2026) : यावल शहरात सार्वजनिक उत्सव समिती सह अन्य दोन अशा तीन ठिकाणी स्वंतत्र मिरवणुका काढत मंगळवारी महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने शहरातील रस्त्यावर निळ्या पताकांसह निळे ध्वज लावले असल्याने शहर निळेमय झाले. मान्यवराच्या हस्ते पंचशिल नगरात, बोरावल गेट भागात व बुरूज चौकात महामानव्याच्या अर्धकृती मुर्ती व प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तिन्ही ठिकाणी एका बग्गीत बाबासाहेबांची प्रतिमा ठेवुन शहरातून सहवाद्य भव्य मिरवणूक काढण्यात आली,
उत्सव समितीतर्फे विविध कार्यक्रम
यावल शहरातील मुख्य सार्वजनिक उत्सव समितीव्दारे तसेच बोरावल गेट आणी अंकलेश्वर बर्हाणपूर राज्य मार्गावरील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागेवरून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. मंगळवारी सकाळी 11 वाजेला शहरातील आठवडे बाजार भागात पंचशील नगरात एका कार्यक्रमाचे आयोजन करीत आमदार अमोल जावळे, नगराध्यक्ष छाया पाटील, एनएसयुआयचे राज्य चिटणीस धनंजय चौधरी, माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, बाळू फेगडे, डॉ.कुंदन फेगडे, जिल्हा परिषदचे माजी सदस्य प्रभाकर सोनवणे, सविता भालेराव,उमेश फेगडे,विष्णु पारधे, कॉग्रेसचे शहराध्यक्ष हाजी हकीम शेख मो.याकुब सह मान्यवरांच्या हस्ते डॉ. आंबेडकराच्या अर्धकृती मुर्ती सह प्रतिमा पुजन करण्यात आले व उपस्थितांनी अभिवादन केले. यानंतर भव्य अशी मिरवणूक शहरात निघाली.

बुरूज चौकात डॉ.आंबेडकरांच्या पुतळयाच्या नियोजित जागेवर अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला येथे अनिल जंजाळे, युवराज सोनवणे, प्रमोद पारधे, अतुल भालेराव, विष्णु पारधे, अशोक बोरेकर, अरूण गजरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. अभिवादन कार्यक्रम पार पडल्यानंतर आकर्षक बग्गीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा ठेवून सवाद्य शहरातून मिरवणूक काढण्यात आली.
शहरातील बुरुज चौक, खिर्निपुरा नगिना मस्जिद, जुने भाजी बाजार, बारी वाडा चौक, काजीपुरा मस्जीद, बोरावल गेट आंबेडकर नगर अशा मार्गाने मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीची सांगता पुनश्च पंचशील नगर सिद्धार्थनगर आठवडे बाजार परिसरात करण्यात आली.तसेच बोरावल गेट भागातून देखील स्वतंत्रपणे मिरवणूक काढण्यात आली होती. शहरात पोलीस निरिक्षक रंगनाथ धारबळे, सहायक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे, उपनिरीक्षक अनिल महाजन व त्यांच्या सर्व सहकारी पोलीस कर्मचार्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
यशस्वीतेेकरीता उत्सव समितीचे अध्यक्ष आनंद बिर्हाडे, विष्णू पारधे, आदित्य सोनवणे, सुमित गजरे, सोहन गजरे, अनुराग तायडे, रोहन सोनवणे, कुणाल भालेराव आदींनी परिश्रम घेतले.









