निधन वार्ता : वंदना विनायक बुवा ; उद्या अंत्ययात्रा
वरणगाव (19 एप्रिल 2026) : शहरातील सावकार गल्लीमधील लहान विठ्ठल मंदिरातील रहिवासी वंदना विनायक बुवा (72) यांचे रविवार, 19 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा सोमवार, 20 रोजी सकाळी आठ वाजता राहत्या घरापासून निघणार आहे.
त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. भागवताचार्य सुदाम महाराज आणि उदय बुवा यांच्या त्या आई होत.



