रिवा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस आता नियमित धावणार
Riva–Chhatrapati Shivaji Maharaj Terminus Express to now run regularly भुसावळ (22 एप्रिल 2026) : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि रिवा दरम्यान धावणार्या विशेष गाड्या नियमित केल्या आहेत. या गाड्या आता नवीन क्रमांकांसह नियमित गाड्या म्हणून धावणार असून रेल्वे प्रवाशांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
असा झाला बदल
सध्या कार्यरत असलेल्या गाडी क्रमांक 02187/02188 रिवा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-रिवा साप्ताहिक विशेष गाड्यांच्या क्रमांकात आता बदल करण्यात आला आहे. गाडी क्रमांक 20153 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-रिवा साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस 24 पासून तर गाडी क्रमांक 20154 रिवा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस 23 पासून रिवा येथून धावणार आहे.

नियमित सेवा सुरू झाल्यामुळे विशेष गाड्या बंद
गाडी क्रमांक 02188 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-रिवा विशेष गाडी 24 पासून तर 02187 रिवा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष गाडी दिनांक 23 पासून बंद करण्यात आली आहे.
गाडी क्रमांक 20153 ही 24 पासून दर शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 1.30 वाजता सुटेल आणि रिवा येथे दुसर्या दिवशी 09.45 वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक 20154 ही 23 पासून दर गुरुवारी रिवा येथून 3.50 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसर्या दिवशी 12.20 वाजता पोहोचेल.
या गाडीला दादर, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, हरदा, इटारसी, पिपरिया, गाडरवारा, नरसिंहपूर, जबलपूर, कटनी, मैहर आणि सतना रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

