भुसावळातील आपले परिवार सार्वजनिक वाचनालयात जागतिक पुस्तक दिन-वाचन संस्कृती अभियान
भुसावळ (23 एप्रिल 2026) : शहरातील वांजोळा रोडवरील आपले परिवार सार्वजनिक वाचनालयात जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून वाचन संस्कृती अभियान 23 एप्रिल ते 30 एप्रिल या सप्ताहात राबविण्यात येत आहे.
उद्घाटन प्रमोद नारायण सरोदे यांच्याहस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. वाचन हे मूलभूत कौशल्य शालेय वयात रुजवून ते विकसित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. वाचन हे पुढील आयुष्याच्या शैक्षणिक यशाचा अंदाज लावते. व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचे भरण पोषण व समाज प्रबोधन वाचनातून होते. वाचन का करावे? कसे करावे? वाचनाचा वेग कसा वाढवावा? काय वाचावे? यासह अनेक प्रयत्नातून प्रकल्प वाचक कसा होईल या दृष्टीने वाचन संस्कृती अभियानात 23 ते 30 एप्रिल पर्यंत निशुल्क सर्वांसाठी विशेष राबविण्यात येत आहे. विद्यार्थी,शिक्षक, पालक, कुटुंब, शाळा, समाज परिसर या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातून प्रगल्भ वाचक घडविणे हे वाचन संस्कृती अभियानाचे उद्दिष्ट असल्याचे उद्घाटकीय भाषणात प्रमोद सरोदे यांनी प्रतिपादन केले.

अभियानात सहभागी होणार्या प्रत्येकास शैक्षणिक, सामाजिक, कौटुंबिक, संस्कार देणारे हितगुज हे आत्मकथा रुपी पुस्तक सप्रेम भेट देऊन स्वागत केले जात आहे. या अभियानात पुस्तक प्रदर्शन, सामूहिक वाचन, वाचक संवाद, मला आवडलेले पुस्तक, माझे वाचन, पुस्तक भेट असे विविध उपक्रम घेण्यात येत आहेत.
