अंजाळेतील नंदग्राम : गो सेवा, कृषी पर्यटन आणि वॉटर पार्कचा अनोखा संगम !
खानदेशातील नवे आकर्षण ; उन्हाळ्यात वाढली पर्यटकांची गर्दी
Nandgram in Anjale : A Unique Blend of Cow Care, Agro-Tourism, and a Water Park! भुसावळ (29 एप्रिल 2026) : सध्या शाळा, कॉलेजला सुट्टी असल्यामुळे वेगवेगळे ग्रुप्स, फॅमिली कुठेना कुठे पिकनिकला जाण्याचा प्लान करीत आहेत मात्र ज्यांना गावी किंवा तीन-चार दिवसांसाठी थंड हवेच्या ठिकाणी जाणे शक्य नाही त्यांच्यासाठी भुसावळजवळील अंजाळेतील नंदग्राम पर्वणी ठरणार आहे. पर्यटकांना गो सेवा, कृषी पर्यटन आणि वॉटर पार्कचा अनोखा संगम येथे पहायला मिळणार आहे.
नंदग्राम गोधाम अॅग्री टुरिझम व वॉटर पार्क
भुसावळपासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावरील अंजाळे , ता.यावल येथील नंदग्राम गोधाम अॅग्री टुरिझम व वॉटर पार्क भुसावळ खान्देशातील पर्यटकांना खुणावत आहे. इथे लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वच वेगवेगळया राईडसचा आनंद लुटू शकतात. महत्वाचे म्हणजे हे वॉटर पार्क भुसावळ शहरापासून काही अंतरावर असल्यामुळे तुमचा प्रवासाचा भरपूर वेळ वाचतो.


पाचशे रुपयात मिळणार ‘या’ सुविधा
पाचशे रुपयांचे तिकीट काढल्यानंतर पर्यटकांना सुरूवातीला वेलकम ड्रींग, पॉपर्कान, कॉटन कॅण्डी फ्री दिली जाणार आहे या शिवाय पीक सीटी (फोटो पार्क), गो तीर्थ (म्युझियम), आपले गाव, बोटींग, शौर्यवन, बालवन (किडस पार्क), पीक्सो पार्क (सेल्फि पार्क), स्विमींग पुलाचा आनंद लुटता येणार आहे.
आजच साधा संपर्क
पर्यटक ग्रुपने आल्यास त्यांना विशेष सवलत दिली जाणार आहे. वॉटर पार्कच्या अधिक माहितीसाठी 9112 9112 48 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संचालक अभिलाष नांगला यांनी केले आहे.
