भुसावळातील प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे महाराष्ट्र दिनी ‘आठवणीतले माहेर कार्यक्रम’
गृहिणींसाठी विविध स्पर्धा : लकी ड्रा विजेत्या महिलांना मिळणार आकर्षक पैठणी
The Pratishtha Mahila Mandal of Bhusawal organized the ‘Memories of the Maternal Home’ program on Maharashtra Day. भुसावळ (29 एप्रिल 2025) : शहरातील प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे शहरातील बालाजी लॉनमध्ये अक्षयतृतीया सणाचे औचित्य साधून शुक्रवार, 1 मे 2025 रोजी सायंकाळी सहा वाजता ‘आठवणीतले माहेर’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा उपक्रमाचे चौथे वर्ष असून मंत्री संजय सावकारे यांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमानिमित्त महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे शिवाय महिलांना कार्यक्रमस्थळी बैलगाडीद्वारे आणून त्यांचे विशेष स्वागत केले जाणार आहे. यावेळी लकी ड्रॉ विजेत्या सखींना आकर्षक पैठणी दिली जाणार आहे.
अशा होणार स्पर्धा
सर्वोत्तम भारतीय नववधू (बेस्ट इंडियन ब्राईडल) ः या स्पर्धेत सहभागी स्पर्धकाला देशातील कुठल्याही राज्यातील नववधूची वेशभूषा साकारता येणार आहे.

समूह नृत्य स्पर्धा (ग्रुप डान्स स्पर्धा)
ग्रुप डान्समध्ये किमान चार महिलांचा सहभाग आवश्यक असून स्पर्धेचा वेळ किमान चार ते पाच मिनिट असणार आहे. अक्षय तृतीया वा महाराष्ट्र दिनावर आधार नृत्य सादर करता येणार आहे. अक्षयतृतीया, देशभक्ती व महाराष्ट्र दिवस यावर आधारित थीम सादर करता येईल शिवाय इतर डान्सदेखील करता येईल.
वेशभूषा स्पर्धा
भारतातील महान स्त्रिया (ऐतीहासिक महान स्त्रिया किंवा आजच्या यशस्वी महान स्त्रिया) यांची वेषभूषा साकारता येणार आहे.
निबंध स्पर्धा
निबंध स्पर्धेसाठी महाराष्ट्रीय कुटूंबातील सण परंपरांचे महत्व, मराठी संस्कृती आणि आखाजी, आखाजी अध्यात्मिक कला व खाद्यसंस्कृती, महाराष्ट्र माझा मी महराष्ट्राची -अपेक्षा व कर्तव्य आदी विषय आहेत. निबंध हे 30 एप्रिलपर्यंत व्हॉटसअॅपवर राजश्री देशमुख यांना मो.8888389793 या क्रमांकावर पाठवावेत शिवाय केवळ दिड ते दोन हजार शब्दमर्यादा अपेक्षित आहे.
मेहंदी स्पर्धा
स्पर्धकांना मेहंदीचा कोन मंडळातर्फे देण्यात येणार आहे.
नाव नोंदणीसाठी येथे साधा संपर्क
स्पर्धेत सहभागासाठी अनिता आंबेकर (07304434949, 09623037418), सोनल महाजन (9130838468), जयश्री चौधरी (9158823288), मनीषा काकडे (7387187060), वैशाली सैतवाल (9511886655), राजश्री बादशाह (8600783976) या क्रमांकावर संपर्क साधावा तसेच कार्यक्रमानंतर महिलांसाठी जेवणाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. स्पर्धेच्या नियोजनासाठी 30 एप्रिलपर्यंत नोंदणी आवश्यक असल्याचे आयोजकांनी कळवले आहे.
माहेरची आठवण जिवंत ठेवण्याचा प्रयत्न : रजनी सावकारे
अक्षयतृतीयेला सासरवाशीन माहेरी येते व माहेरच्यांसोबत रमते, झोके खेळते, माहेरी आंब्याचा रस, पुरणाची पोळी, कुरडई-पापड यांचा मनसोक्त आस्वाद घेते मात्र बदलत्या जीवन शैलीमुळे हे चित्र आता दुर्मीळ होवू पाहत आहे. प्रत्येक महिलेच्या मनातील माहेरची आठवण जिवंत राहून तिला माहेरची उणीव भासू नये म्हणून प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे ‘आठवणीतले माहेर’ या कार्यक्रमाचे आयोजन बालाजी लॉनमध्ये करण्यात आल्याचे मंडळाच्या अध्यक्षा व आयोजक रजनी सावकारे यांनी सांगून महिलांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही केले.
