गुणोरेत एकाच कुटुंबातील चौघांनी मृत्यूला कवटाळले


अहमदनगर : पारनेर तालुक्यातील गुणोरे येथील एकाच कुटुंबातील चौघांनी मृत्यूला कवटाळल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. गुणोरे येथील म्हसे खुर्द रोड लगतच्या बढे ढवळे वस्तीवरील रहिवासी बाबाजी विठ्ठल बढे (40), कविता बाबाजी बढे (35), आदित्य बाबाजी बढे (15), धनंजय बाबाजी बढे (13) या एकाच कुटुंबातील चार जणांनी घरातील लोखंडी पाईपला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी ही घटना उघडकीस आली. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे या परिसरातून ग्रामस्थ जात असताना बाबाजी बढे यांच्या गोठ्यातील जनावरे का हंबरत आहेत म्हणून ग्रामस्थांनी खिडकीतून डोकावले असता ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही. बाबाजी विठ्ठल बढे हे शेती पशूपालन करून आपल्या कुटुंबाची उपजिवीका भागवत होते.


कॉपी करू नका.