दहावी परीक्षेत भुसावळतील आर.एस.आदर्श हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश


भुसावळ (9 मे 2026) : शहरातील आर.एस.आदर्श हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेत घवघवीत यश मिळवले. शुक्रवार, 8 मे रोजी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला. त्यात शाळेचे 30 पैकी 27 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शाळेचा निकाल 90 टक्के लागला.

प्रथम साक्षी कल्याणचंद कुमावत (94 %), द्वितीय विनय जितेंद्र फुलवाणी (93.60 %) व तृतीय प्राची सुनीलकुमार मूलचंदानी (87.80 %) आली.



यशस्वी विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव
संस्थेचे चेअरमन नंदलाल नागदेव, व्हाईस चेअरमन रमेशलाल अठवणी, सेक्रेटरी प्रकाशलाल बत्रा, प्रायमरी चीफ प्रकाशलाल कृपलानी व शाळेचे मुख्याध्यापक व्ही.आर.मंगलानी आणि इतर सर्व पदाधिकार्‍यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !