साकेगावातील श्री स्वामीनारायण गुरुकुल विद्यालयाचा शंभर टक्के निकाल
साकेगाव (10 मे 2026) : साकेगावातील श्री स्वामीनारायण गुरुकुल विद्यालयाने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या शैक्षणिक वर्ष 2025-26 च्या दहावी परीक्षेचा निकालात विद्यालयाची परंपरा कायम ठेवली. मराठी सेमी व इंग्रजी माध्यमाचा निकाल शंभर टक्के लागला.
या विद्यार्थ्यांनी मिळवले यश
सेमी मराठी माध्यमातून कृष्णा रमेश पाटील 91.20 % गुण मिळवून प्रथम तर सोनाक्षी विलास सावळे व राणी गोपाळ भोळे या दोन्ही विद्यार्थिनींनी 90.80% गुण मिळवून द्वितीय तर भूषण संभाजी ठाकरे 86.60% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.


इंग्रजी माध्यमातून हर्ष गजानन जाधव या विद्यार्थ्याने 96.20% गुण मिळवून प्रथम क्रमांक तर चिन्मयी महेश चोपडे या विद्यार्थिनीने 94.60% गुण मिळवून द्वितीय तर यशश्री राहुल बडगुजर या विद्यार्थिनीने 94.00% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष के.के.शास्त्रीजी, संचालक गोपाळ भगत सर्व संस्था पदाधिकारी तसेच मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका प्रणिता चौधरी व इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका उज्वला धांडे, सर्वशिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.