पोलीस प्रशासनात फेरबदल : नाशिक परीक्षेत्राच्या विशेष महानिरीक्षकपदी संजय येनपुरे
Reshuffle in Police Administration: Sanjay Yenpure Appointed as Special Inspector General of Nashik Range भुसावळ (22 मे 2026) : पोलीस प्रशासनातील अधिकार्यांच्या बदल्यानंतर यंदादेखील फेर बदल्यांचा प्रकार समोर आला आहे. नाशिक परिक्षेत्राच्या विशेष महानिरीक्षकपदी प्रवीण पडवळ यांची नियुक्ती करण्यात आली मात्र अवघ्या आठवडाभरात पुन्हा त्यांची सुधारित बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी संजय येनपुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संजय येनपुरे नवीन आयजी
प्रवीण पडवळ यांची नाशिक परिक्षेत्रातून व्हीआयपी सुरक्षा, दादर येथे बदली करण्यात आली असून संजय येनपुरे यांची नाशिक परिक्षेत्रात नियुक्ती करण्यात आली आहे.



राज्यातील पोलिस प्रशासनात मोठा फेरबदल करण्यात आला आहे. पोलिस दलातील आयपीएस अधिकार्यांसह विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस उपमहानिरीक्षक तसेच विविध महत्त्वाच्या पदांवरील 23 अधिकार्यांना नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शासनाच्या आदेशानुसार अनेक वरिष्ठ अधिकार्यांना नवीन जबाबदार्या देण्यात आल्या..
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांची आठवडाभरापूर्वी राज्य मानवी हक्क आयोगात विशेष पोलिस महानिरीक्षकपदी बदली करण्यात आल्यानंतर त्यांच्या जागी प्रवीण पडवळ यांची बदली करण्यात आली मात्र आठवडाभरात ही बदली रद्द करीत पडवळ यांना व्हीआयपी सुरक्षा, दादर येथे बदली देण्यात आली तर त्यांच्या जागी संजय येनपुरे यांची नाशिक परिक्षेत्रात नियुक्ती करण्यात आली.
अशा झाल्या नियुक्त्या
नाशिकचे अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांची बदली नागपूर येथे झाली असून त्यांच्या जागी अहिल्यानगर येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या समादेशक विमला एम. यांची नियुक्ती केली आहे. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांची पोलीस उपायुक्त, मुंबई शहर येथे बदली झाली होती मात्र त्यांना आता उपायुक्त ठाणे शहर येथे नियुक्ती देण्यात आली.
प्रतीक्षाधीन शारदा राऊत यांना महिला अत्याचार प्रतिबंध विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली तर अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांची नियोजन व समन्वयचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बदली करण्यात आली.
संदीप पाटील यांची अमरावती परिक्षेत्रातून नागपूरला विशेष पोलीलस महानिरीक्षक म्हणून बदली झाली आहे तर विशेष पोली महानिरीक्षक, पोली गृहनिर्माण व कल्याण महामंडळाचे पंजाबराव उगले हे आता ठाणे शहराचे पोलिससह आयुक्त असतील व महेश पाटील हे आता अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक असतील.







