महिलांच्या आत्मसंरक्षणासाठी लाठी-काठी व तलवारबाजी प्रशिक्षण
महाराणा प्रताप जयंती उत्सव समिती 2026 : श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना आणि सारिका ताई पाटील बहुउद्देशीय संस्थेचा संयुक्त पुढाकार
भुसावळ (23 मे 2026) : श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना, महाराणा प्रताप जयंती उत्सव समिती 2026 तसेच सारिकाताई पाटील बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला भव्य लाठी-काठी व तलवारबाजी प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहातझाला. हा कार्यक्रम शुक्रवार, 22 मे 2026 रोजी सायंकाळी ताप्ती पब्लिक स्कूलच्या भव्य क्रीडांगणावर सन्माननीय महेश फालक यांच्या सहकार्याने पार पडला.
यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या सौभाग्यवती व प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे होत्या. प्रभाग क्रमांक 25 च्या कर्तव्यदक्ष नगरसेविका सोनल महाजन यांची प्रमुख उपस्थिती लाभली.




यावेळी महाराणा प्रताप ग्रुप, शिवकन्या ग्रुप, झाशीची राणी ग्रुप, मातृशक्ती ग्रुप, अहिल्यादेवी होळकर ग्रुप, सावित्रीबाई फुले ग्रुप, जिजाऊच्या लेकी ग्रुप तसेच राणी पद्मावती ग्रुप यांनी लाठी-काठी व तलवारबाजीची प्रभावी प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
महिलांनी आत्मसंरक्षणासाठी सक्षम बनणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन करत रजनीसावकारे यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी महिलांनी स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण घेऊन आत्मविश्वास वाढवावा, असे आवाहन केले.
यांचे यशस्वीतेसाठी परिश्रम
यशस्वीतेसाठी करणी सेनेच्या जिल्हाध्यक्ष सारिका ाटील, तालुकध्यक्ष कविता पाटील, जिल्हा उपाध्यक्ष मीना पाटील, महाराणा प्रताप जयंती उत्सव समिती 2026 च्या अध्यक्षा जयश्री पाटील, उपाध्यक्षा प्रतीक्षा पाटील, प्रियंका राजपूत, श्रद्धा राजपूत, गायत्री राजपूत, अनिता राजपूत, आशा राजपूत, संजना राजपूत यांनी विशेष परिश्रम घेतले.







