धुळ्यातील पुरामुळे पूल वाहिल्याने वाहनधारकांचे हाल
पुलांची डागडूजीची मागणी ; वाहनधारकांची प्रचंड गैरसोय
धुळे : शहरातील पांझरा नदीला आलेल्या काही दिवसांपूर्वी महापूर आल्याने तीनही पुलांची प्रचंड दुरवस्था झाल्याने वाहनधारकांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे रुग्णवाहिकादेखील या पुलावरून जात नसल्याने रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना प्रचंड मनस्ताप होत आहे. प्रशासनाकडून पुलांची डागडूजी करावी, अशी अपेक्षा आहे.
धुळ्यातील पुलांच्या दुरवस्थेमुळे होणारे हाल पहा या व्हिडिओच्या लिंकवर- https://youtu.be/ZFdjV4JDmB8