मार्ग बदललेली अमरावती-पुणे एक्सप्रेस नियमित मार्गावरून धावणार !


भुसावळ (26 मे 2026) : मध्य रेल्वे, पुणे मंडळामार्फत दौंड-मनमाड विभागातील विसापूर-रांजणगाव-सारोळा स्थानकांदरम्यान सुरू असलेल्या दुहेरीकरणाच्या कामामुळे गाडी क्रमांक 11026/11025 अमरावती-पुणे एक्सप्रेसचा मार्ग बदलण्यात आला होता. आता संबंधित निर्णयात सुधारणा करून रेल्वे प्रशासनाने या गाड्या त्यांच्या नियमित मार्गावरून चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

गाडी क्रमांक 11026 अमरावती-पुणे एक्सप्रेस, बुधवार, 27 मे रोजी अमरावतीहून आपल्या नियमित मार्गाने सुटेल व पुणे स्थानकावर पोहोचेल.

गाडी क्रमांक 11025 पुणे-अमरावती एक्सप्रेस, गुरुवार, 28 मे रोजी पुण्याहून आपल्या नियमित मार्गाने सुटेल व अमरावती स्थानकावर पोहोचेल.

रेल्वे प्रवाशांनी वरील बदलांची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !