यावल तालुक्यातील 47 ग्रामपंचायतीच्या वॉर्डनिहाय आरक्षण काढण्याकरीता कार्यक्रम जाहिर


यावल (28 मे 2026) : यावल तालुक्यातील 47 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसंदर्भात प्रशासनाकडून हालचाली सुरू आहेत. या सर्व 47 ग्रामपंचायतीच्या वॉर्ड निहाय आरक्षण काढण्याचा कार्यक्रम जाहिर करण्यात आला. 12 जुन रोजी त्या-त्या ग्रामपंचायतीत विशेष सभा बोलावून प्रारूप आरक्षण काढण्यात येईल व त्यावर 25 जुनपर्यंत हरकती व करीता मुदत दिली जाणार आहे. अंतिम वॉर्डनिहाय आरक्षण हे 10 जुलै रोजी प्रसिध्दी दिली जाणार आहे व त्यानंतर निवडणूक कार्यक्रम घेतला जाहिर होणार आहे.

47 ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणूक
यावल तालुक्यातील मुदत संपत संपलेल्या 47 ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहे. या सर्व 47 ग्रामपंचायतीच्या वॉर्ड रचनेची कार्यवाही प्रशासनाने पुर्ण केली आहे. आता त्या-त्या ग्रामपंचायीतचे वॉर्डनिहाय ग्रामपंचायत सदस्यांचे आरक्षण काढण्यात येणार आहे.

यावल तहसील कार्यालयात तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, निवासी नायब तहसीलदार बी.एम.पवार, नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे, सुयोग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील त्या-त्या ग्रामपंचायतीत वॉर्डनिहाय आरक्षण काढण्याकरीता अधिकारी नियुक्त केले जाणार आहेत. 12 जुन रोजी त्या-त्या ग्रामपंचायतीत विशेष सभा बोलावण्यात येईल व त्या-त्या वॉर्डातील विविध प्रवर्गातील लोकसंख्या लक्षात घेता आरक्षण काढले जाईल व या प्रारूप वॉर्डनिहाय आरक्षणास 19 जुन रोजी प्रसिध्द केले जाणार आहे. .

दरम्यान, या प्रारूप आरक्षणास जर कुणाची हरकत असेल तर हरकती व सुचने करीता 25 जुनपर्यंत हरकती व सुचना दाखल करता येणार आहे. प्राप्त हरकतींवर निपटारा करून अंतिम वॉर्डनिहाय आरक्षण 10 जुलै रोजी प्रसिध्द केले जाईल व त्यानंतर सार्वत्रिक निवडणुकाचा कार्यक्रम जाहीर होणार आहे.

या ग्रामपंचायतीत निघणार सदस्यांचे आरक्षण व तेथील आरक्षीत सरपंच पद असे-

अनुसुचित जमाती राखीव- वड्री खुर्द, कोसगाव, सांगवी खुर्द, पिळोदे खुर्द, हंबर्डी, राजोरे.

अनुसुचित जामाती महिला राखीव- कोरपावली, कासवे, शिरसाड, मनवेल, मारूळ, बामणोद, विरोदे, बोरावल खुर्द,

अनुसूचित जाती राखीव- किनगाव बुद्रुक, मोहराळे, डांभुर्णी, निमगाव

अनुसुचित जाती महिला राखीव- वनोली, दुसखेडे, अंजाळे.

नामाप्र- भालशीव, हिंगोणे, आमोदे, सातोद, विरावली, नायगाव

नामाप्र महिला राखीव- दहिगाव, भालोद, पिंप्री, उंटावद, वढोदे प्र.सावदा, कोळवद, महेलखेडी

सर्वसाधारण- चिंचोली, बोरखेडा बुद्रुक, सावखेडेसीम, पिंपरूड, टाकरखेडे

सर्वसाधारण महिला राखीव- अट्रावल, डोंगरकठोरा, सांगवी बुद्रुक, डोणगाव, नावरे, वढोदे प्र.यावल, बोरावल बुद्रुक, आडगाव




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !