भुसावळात अग्रवाल महिला मंडळाकडून पुरुषोत्तम मासानिमित्त सामूहिक पूजन व भजनांचा भक्तीमय सोहळा


भुसावळ (28 मे 2026) : स्थानिक अग्रवाल महिला मंडळाच्या वतीने पवित्र पुरुषोत्तम (धोंड्याचा) मासानिमित्त एका विशेष सामूहिक धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. शहरातील प्रसिद्ध श्रीराम मंदिरात हा भक्तीमय सोहळा गुरुवार, 28 रोजी सकाळी 11 वाजता झाला.

या पवित्र महिन्याचे औचित्य साधून मंडळाच्या सदस्यांनी एकत्र येत श्रीराम मंदिरात सामूहिकरीत्या ‘प्रथम तुला दान’ विधी केला आणि सर्व देवी-देवतांचे मनोभावे पूजन केले. पूजन झाल्यानंतर महिलांनी भक्तीमय वातावरणात विठ्ठल-नामाचा गजर करत सामूहिक भजनांचा आनंद घेतला. या सुश्राव्य भजनांनी संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला होता.
ब्राह्मण भोजन व दानधर्मधार्मिक विधींनंतर या मंगल प्रसंगी उपस्थित ब्राह्मणांना सवत्निक (पत्नीसह) आदरपूर्वक भोजन देण्यात आले. तसेच मंडळाच्या वतीने त्यांना यथाशक्ती दक्षिणा आणि वाण देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

मंडळाच्या पदाधिकार्‍यांचे नेटके नियोजन
या यशस्वी आणि शिस्तबद्ध धार्मिक उत्सवाचे आयोजन अग्रवाल महिला मंडळातर्फे करण्यात आले. यावेळी मंडळाच्या अध्यक्षा नेहा श्याम अग्रवाल, उपाध्यक्ष रेखा अग्रवाल, सचिव विणा अग्रवाल आणि कोषाध्यक्ष निकीता अग्रवाल, माजी अध्यक्षा नंदा अग्रवाल, सहसचिव विशाखा अग्रवाल व श्याम अग्रवाल यांचे मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले.

महिला भगिनींचा उत्स्फूर्त सहभाग
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रोजेक्ट चेअरमेन आरती अग्रवाल, दीप्ती अग्रवाल, ज्योती अग्रवाल, कृष्णा अग्रवाल, संगीता सुनील अग्रवाल, पूजा अग्रवाल, नंदा अग्रवाल, रेखा अग्रवाल, रूपा अग्रवाल, नीलम अग्रवाल, रजनी अग्रवाल, नीता अग्रवाल, उर्मिला अग्रवाल, कांता अग्रवाल, प्रीती मित्तल, नेहा अग्रवाल,प्रिया अग्रवाल,ज्योती अग्रवाल, वीणा महेंद्र अग्रवाल, मनीषा अग्रवाल आणि मंजू अग्रवाल यांच्यासह मंडळाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सर्व महिला भगिनींच्या उत्साही सहभागामुळे हा पुरुषोत्तम मासाचा उत्सव अत्यंत आनंदात आणि भक्तीमय वातावरणात झाला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !