‘आय.पी.एल.’चा थरार जळगावकर अनुभवणार एलईडी स्क्रीनवर!
भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशन, जैन स्पोर्ट्स अकॅडेमी व युवाशक्ती फाउंडेशनतर्फे आय.पी.एल. अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण ; काव्यरत्नावली चौकात भव्य आयोजन
जळगाव (30 मे 2026) : आय.पी.एल. क्रिकेट स्पर्धेची अंतिम लढत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध गुजरात टायटन्स या संघांत होणार असून या लढतीचा थरार जळगावकरांना मोठ्या पडद्यावर देखील पाहावयास मिळणार आहे. भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशन, जैन स्पोर्ट्स अकॅडेमी व युवाशक्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या अंतिम लढतीचे थेट प्रक्षेपण काव्यरत्नावली चौक येथे रविवार दिनांक 31 मे 2026 रोजी सायंकाळी 7 वाजेपासून दाखविले जाणार आहे. प्रवेश सर्वांसाठी खुला आहे. सेल्फी पॉइंट, डिस्को जॉकी आदी व्यवस्था करण्यात आली आहे.
देशात सध्या आय.पी.एल. क्रिकेट स्पर्धेची धूम असून या स्पर्धेचा अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स या संघात होणार आहे. त्यामुळे या अंतिम सामन्याची उत्सुकता सर्व क्रिकेटप्रेमींना लागली आहे. हा ऐतिहासिक क्षण मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी जळगाव शहरातील जैन स्पोर्ट्स अकॅडेमी, भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशन व युवाशक्ती फाउंडेशनतर्फे रविवार, दि. 31 मे 2026 रोजी सायंकाळी 7 वाजेपासून अंतिम सामना 10 बाय 20 फूट अशा मोठ्या एल.ई.डी. स्क्रीनवर नागरिकांना दाखवण्याची व्यवस्था केली आहे. ही सामन्याच्या सुरुवातीपासून ते सामना संपेपर्यंत केली आहे.
आकर्षक आतषबाजीसह सेल्फी पॉइंट, डिस्को जॉकी..
सामन्याचा आनंद घेताना क्रिकेटप्रेमींना डीजेवरील गाण्यांचा, पंजाबी ढोल तसेच आकर्षक आतषबाजीचादेखील आनंद घेता येणार आहे. सहकुटुंब सामन्याचा आनंद घेण्यासाठी बसण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सेल्फी पॉइंट, डिस्को जॉकी आदी व्यवस्था करण्यात आली आहे.
आय.पी.एल. स्पर्धेचा अंतिम सामना रविवार सुट्टीच्या दिवशी आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींना हा अंतिम सामन्याचा क्रिकेटचा थरार अनुभवण्यासाठी पर्वणीच मिळाली आहे. जास्तीत जास्त जळगावकर नागरिक व क्रिकेटप्रेमींना या ऐतिहासिक सामना पाहण्यासाठी यावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
