मुलीला ट्यूशनला सोडून परतणार्या शिक्षकाची निर्घृण हत्या
अमृतसर (2 जून 2026) : मुलीला ट्यूशनला सोडून स्कूटीवरून घरी परतणार्या सरकारी शाळेतील शिक्षकाची भरदिवसा गळा चिरून हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना अमृतसरमध्ये घडली. जगदीप सिंग (40) असे मृत शिक्षकाचे नाव आहे.
काय आहे प्रकरण
अकरावतील आपल्या मुलीला जंडियाला येथे ट्यूशनला सोडून स्कूटीवरून घरी परतत असताना जगदीपसिंग यांना हल्लेखोरांनी रस्त्यात घेरले. त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी सपासप वार करण्यात आले. हल्लेखोरांनी थेट त्यांच्या गळ्यावर वार केला त्यामुळे जास्त रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह रस्त्यावर पालथा पडलेला आढळला. आजूबाजूला मांसाचे तुकडेही विखुरलेले होते. घटनेनंतर लगेच पोलीस तिथे पोहोचले. त्यानंतर हल्लेखोरांच्या शोधात सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात आहेत. जगदीप गैरी मंडी शाळेत शिक्षक होते.


