भुसावळ विभागाला मे 2026 मध्ये प्रवासी महसूलातून 85.45 कोटींची कमाई
भुसावळ (6 जून 2026) : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने मे 2026 दरम्यान प्रवासी वाहतुकीतून महसूल प्राप्तीमध्ये उल्लेखनीय यश मिळवले. भुसावळ विभागाला आरक्षित व अनारक्षित तिकिटांच्या विक्रीतून एकूण रु. 85.45 कोटी प्रवासी महसूल प्राप्त झाला. ही प्राप्ती निर्धारित उद्दिष्टापेक्षा 2.40 टक्के अधिक असून मे 2025 च्या तुलनेत 20 टक्के वाढ दर्शविते.
या महत्त्वपूर्ण यशामध्ये आरक्षित तसेच अनारक्षित या दोन्ही प्रवासी वर्गांमधील सातत्यपूर्ण वाढीचा मोलाचा वाटा आहे.
मे महिन्यात असा मिळाला महसूल
आरक्षित प्रवासी महसूल : रु. 47.47 कोटी, जो मे 2025 च्या तुलनेत 28 टक्के अधिक आहे.
अनारक्षित प्रवासी महसूल : रु. 37.98 कोटी, जो मे 2025 च्या तुलनेत 11 टक्के अधिक आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे, कार्यक्षम संचालन सुनिश्चित करणे तसेच ग्राहक समाधान वाढविण्यासाठी विभागाने केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित आहे. प्रवासी उत्पन्नातील ही सातत्यपूर्ण वाढ विभागाच्या धोरणात्मक उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीचे तसेच रेल्वे प्रवाशांच्या वाढत्या विश्वासाचे प्रतीक आहे.
भुसावळ विभाग भविष्यातही सुरक्षित, वेळेवर आणि गुणवत्तापूर्ण रेल्वे सेवा प्रदान करण्यासाठी कटीबद्ध असून प्रवाशांना उत्कृष्ट सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहील.



