भुसावळात द्विसाप्ताहिक पारंपारिक ऑनलाईन योग शिबिराला सुरूवात


भुसावळ (8 जून 2026) : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालय, योग केंद्र समिती व अद्वैतानंद योगा अ‍ॅण्ड फिटनेस स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित द्विसाप्ताहिक पारंपारिक ऑनलाईन योग शिबिराचे आभासी उद्घाटन (ऑनलाईन) सोमवार, 8 जून रोजी करण्यात आले. उद्घाटक पूजा पुंडीर (संचालक (प्रकल्प) इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्युमन व्हॅल्यूज, भारत) होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून योग शिक्षक देवेंद्र पाटील, भोळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजू फालक, योग शिक्षिका व अद्वैतानंद योगा अ‍ॅण्ड फिटनेस स्टुडिओ संचालिका प्रा.डॉ.सीमा देवेंद्र, प्रा.डॉ.संजय चौधरी भुसावळ उपस्थित होते.

योगाचे महत्त्व अधिक वाढले
पूजा पुंडीर म्हणाल्या की, योग ही केवळ शारीरिक व्यायाम पद्धती नसून ती शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधणारी जीवनशैली आहे. आजच्या धकाधकीच्या, तणावपूर्ण जीवनात योगाचे महत्त्व अधिक वाढले आहे.

योग जीवन जगण्याची एक प्रभावी कला
देवेंद्र पाटील यांनी योगाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की,
आजच्या स्पर्धात्मक आणि तणावग्रस्त जीवनात योग हा केवळ व्यायाम नसून जीवन जगण्याची एक प्रभावी कला आहे. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक स्वास्थ्य आणि आत्मविश्वासही वाढतो.

योग ही भारतीय संस्कृतीची जगाला मिळालेली अमूल्य देणगी
प्राचार्य डॉ.राजू फालक म्हणाले की, योग ही भारतीय संस्कृतीची जगाला मिळालेली अमूल्य देणगी आहे. निरोगी शरीर, संतुलित मन आणि सुसंस्कृत जीवनमूल्ये यांची जपणूक करण्यासाठी योग अत्यंत उपयुक्त आहे.

15 दिवसीय योग शिबिर
8 ते 21 जून 2026 सकाळी 6.15 ते 7 दरम्यान 15 दिवसीय विशेष योग शिबिरामध्ये आंतरराष्ट्रीय योग प्रोटोकॉलसोबत विविध पारंपारिक योगिक क्रिया शिकवल्या जाणार आहेत. शिबिर पूर्ण करणार्‍यांना ई सर्टीफिकेट प्रदान करण्यात येईल. प्रास्ताविक प्रा.डॉ.सीमा देवेंद्र तर आभार प्रा.डॉ.अनिल सावळे यांनी मानले. अधिक माहितीसाठी व सहभागी होण्यासाठी प्रा.डॉ.सीमा देवेंद्र (7756042375), देवेंद्र पाटील (8805729473) व प्रा.डॉ.संजय चौधरी (9422773747) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !