यावल तालुक्यातील 47 ग्रामपंचायतीचे वॉर्डनिहाय आरक्षण जाहीर

प्रारूप प्रसिध्दी 19 जुनला तर 25 जुनपर्यंत हरकतींसाठी मुदत


Ward-wise reservation announced for 47 Gram Panchayats in Yaval Taluka यावल (13 जून 2026) : यावल तालुक्यातील 47 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसंदर्भात प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहे. या सर्व 47 ग्रामपंचायतीच्या वॉर्डनिहाय आरक्षण शुक्रवारी काढण्यात आले आहे. सर्व ग्रामपंचायतीत आरक्षण काढण्याकरीता विशेष सभा पार पडली व त्या-त्या ग्रामपंचायत कार्यालयात वॉर्डनिहाय प्रारूप आरक्षण काढत ते जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येईल व 19 जुन रोजी त्यास अधिकृत प्रारूप आरक्षण म्हणुन प्रसिध्द केले जाणार आहे.

दरम्यान, हरकतीकरीता 25 जुनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. अंतिम वॉर्डनिहाय आरक्षण हे 10 जुलै रोजी प्रसिध्द केले जाणार आहे. यावल तालुक्यातील मुदत संपत संपलेल्या 47 ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरीता प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहे. या सर्व 47 ग्रामपंचायतीच्या वॉर्ड रचनेची कार्यवाही प्रशासनाने पुर्ण केल्यानंतर शुक्रवारी तहसील कार्यालयात तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, निवासी नायब तहसीलदार बी.एम.पवार, नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे, सुयोग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्या-त्या ग्रामपंचायीतीचे वॉर्डनिहाय ग्रामपंचायत सदस्यांचे आरक्षण काढण्यात आले.

त्या-त्या वार्डातील विविध प्रवर्गातील लोकसंख्या लक्षात घेता सदर आरक्षण काढण्यात आले. आरक्षण काढत ते जिल्हाधिकारी यांच्याकडेे प्रस्तावित करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी त्यांच्या स्तरावर 19 जुन रोजी अधिकृतरित्या ग्रामपंचायतीच्या वॉर्डनिहाय प्रारूप आरक्षणास 19 जुन रोजी प्रसिध्दी देतील. या प्रारूप आरक्षणास जर कुणाची हरकत असेल तर हरकती व सुचनेकरीता 25 जुनपर्यंत हरकती व सुचना दाखल करता येतील.

प्राप्त हरकतींवर निपटारा करून अंतिम वॉर्डनिहाय आरक्षण 10 जुलै रोजी प्रसिध्द केले जाईल व त्यानंतर सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होणार आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !