भुसावळात 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ‘योगोत्सव 2026’चे आयोजन
भुसावळ (16 जून 2026) : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अद्वैतानंद योगा अँड फिटनेस स्टुडिओ, दि आर्ट ऑफ लिव्हिंग (भुसावळ) आणि प्रतिष्ठा महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, 21 जून 2026 रोजी भव्य ‘योगोत्सव 2026’ आयोजित करण्यात आला आहे.
यंदाच्या योग दिनाची संकल्पना ‘योगा फॉर हेल्थी एजिंग’ अशी असून, भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने निर्धारित केलेल्या कॉमन योगा प्रोटोकॉलनुसार सामूहिक योगाभ्यास घेण्यात येणार आहे. तसेच अद्वैतानंद शंखध्वनी ग्रुपच्या वतीने विशेष सामूहिक शंखनाद कार्यक्रमही होणार आहे.
हा कार्यक्रम सकाळी 7.00 ते 8.30 या वेळेत रामानंद लॉन्स, रिंग रोड, जळगाव रोड, भुसावळ येथे होईल. कार्यक्रमासाठी प्रवेश सर्वांसाठी खुला असून पूर्णतः निःशुल्क आहे.
आयोजकांनी नागरिकांना आपल्या कुटुंबीय, नातेवाईक व मित्रांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. वर्षभर विविध दिवस उत्साहात साजरे करतो, त्याचप्रमाणे आपल्या आरोग्य आणि फिटनेससाठी किमान एक दिवस योगासाठी देऊया, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी देवेंद्र पाटील (8805729473), कुणाल महाजन (9823899377), प्रा.डॉ.सीमा देवेंद्र पाटील (7756042375) यांच्याशी संपर्क साधण्याचे आयोजकांनी कवळले आहे.




