यावलच्या साने गुरूजी विद्यालयात विद्यार्थ्यांना पाठ्य पुस्तकांचे वितरण
यावल (16 जून 2026) : यावल नगरपरिषद संचलित पीएमश्री साने गुरूजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नवीन शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस विद्यार्थ्याचे स्वागत व पाठपुस्तक व गणवेश वितरण करून करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, नगराध्यक्ष छाया पाटील, नगरसेवक अतुल पाटील, शालेय शिक्षण समिती सभापती पराग सराफ, शालेय शिक्षण समितीच्या सदस्य शाहीन बानो, मुख्याध्यापक एम.के.पाटील उपस्थित होते. प्रसंगी विद्यार्थ्यांना मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
सूत्रसंचालन विद्यालयाचे शिक्षक डी.एस.फेगडे यांनी केले. यशस्वीतेसाठी उपप्राचार्य ए.एस.इंगळे, पर्यवेक्षक व्ही.टी.नन्नवरे यांनी परिश्रम घेतले.




