पाडळसे ग्रामीण शिक्षण संस्थेच्या चेअरमनपदी योगराज बर्‍हाटे


यावल (16 जून 2026) : यावल तालुक्यातील पाडळसे येथील नामांकित ‘ग्रामीण शिक्षण संस्था’ संचलित लोक विद्यालयाच्या चेअरमन पदी योगराज डिगंबर बर्‍हाटे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

बैठकीत एकमताने निर्णय
संस्थेच्या संचालकांची नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडली, ज्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. योगराज बर्‍हाटे यांना सहकार आणि राजकीय क्षेत्राचा दांडगा अनुभव असल्याने त्यांच्या या अनुभवाचा मोठा फायदा शिक्षण संस्थेला आणि पर्यायाने विद्यार्थ्यांना होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

योगराज बर्‍हाटे यांच्या या निवडीबद्दल रावेर-यावल विधानसभेचे आमदार अमोल जावळे यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले. यासोबतच यावल तालुक्यातील राजकीय, सहकार, सामाजिक आणि शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवरांनी बर्‍हाटे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !