भुसावळातील झेडटीसी परिसराला जोडणार्‍या बोगद्यात दुरुस्तीच्या कामांना सुरूवात


भुसावळ (18 जून 2026) : शहरातून झेडटीसी परिसराला जोडणार्‍या इटारसी रेल्वे मार्गावरील बोगद्यात पावसाच्या पूर्वीच खड्डे पडल्याने वाहनधारकांची गैरसोय होत होती. रेल्वे विभागाने आता या अंडरपासमध्ये काही भागात नवीन काँक्रिट रस्ता व दुरुस्तीचे काम सुरु केले आहे. यामुळे पावसाळ्यात या मार्गाने वापरणार्‍या तब्बल 25 हजार वाहनधारकांना दिलासा मिळेल.

बोगद्यात साचते पाणी
इटारसी रेल्वे लाइनवर असलेला जुना रस्ता कायमस्वरुपी बंद करुन त्या ठिकाणी नवीन बोगदा तयार करण्यात आला होता. दरवर्षी पावसाळ्यात या बोगद्यात पाणी साचते. यामुळे खड्ड्यांचे जंजाळ निर्माण झाले होते. याबाबत दिव्य मराठीने वृत्त प्रसिद्ध करुन प्रशासनाचे लक्ष वेधले. यामुळे रेल्वे विभागाने मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेल्या भागात काँक्रिटीकरणचे पॅचवर्क सुरु केले आहे. सोबत इतर लहानमोठे खड्डे बुजवून लवकरच रस्ता खड्डेमुक्त केला जाणार आहे. या बोगद्यातून झेडटीसी, फेकरी, दीपनगर, संत गाडगेबाबा अभियांत्रिकीचे विद्यार्थी व प्राध्यापक दररोज प्रवास करतात.



पाण्याची निचरा होत नसल्याची अडचण
नवीन डोम बांधकामासाठी प्रयत्न करणे आवश्यक रेल्वे विभागाने वाढीव अंडरपासच्या कामावर अद्यापही डोम टाकलेला नाही. पाण्याचा निचरा करण्यासाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था नाही. यामुळे पावसाळ्यात बोगद्यात पाणी साचल्यास पंप बसवून त्याचा उपसा करावा लागणार आहे. आगामी काळात पाणी साचणार नाही, यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !