प्रवाशांच्या सोयीसाठी उधना ते मधुबनी आणि उधना ते झंझारपुर विशेष रेल्वेच्या कालावधीत वाढ
भुसावळ (19 जून 2026) : प्रवाशांची वाढती संख्या व सोय लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने उधना-मधुबनी आणि उधना-झंझारपूर साप्ताहिक विशेष रेल्वेच्या संचालन कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील पुढीलप्रमाणे:
उधना ते मधुबनी साप्ताहिक विशेष गाडी
गाडी क्रमांक 09045 उधना ते मधुबनी साप्ताहिक विशेष गाडी पूर्वी अधिसूचित 14 जूनपर्यंत चालवण्यात येणार होती मात्र या गाडीचा कालावधी आता 5 जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे.



गाडी क्रमांक 09046 मधुबनी-उधना साप्ताहिक विशेष गाडी पूर्वी अधिसूचित 15 जूनपर्यंत चालवण्यात येणार होती मात्र आता गाडीचा संचालन कालावधी वाढवून आता 6 जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे.
उधना-झंझारपूर साप्ताहिक विशेष गाडी
गाडी क्रमांक 09047 उधना-झंझारपूर साप्ताहिक विशेष गाडी पूर्वी अधिसूचित 14 जूनपर्यंत चालवण्यात येणार होती मात्र आता गाडीचा संचालन कालावधी वाढवून आता 5 जुलै 2026 पर्यंत करण्यात आला आहे.
गाडी क्रमांक 09048 झंझारपूर-उधना साप्ताहिक विशेष गाडी पूर्वी अधिसूचित 15 जुनपर्यंत चालवण्यात येणार होती मात्र आता गाडीचा संचालन कालावधी वाढवून आता 6 जुलै 2026 पर्यंत करण्यात आला आहे.
