आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भुसावळात ‘योगोत्सव 2026’चे आयोजन

सामूहिक योगाभ्यासासह शंखनादाचा अनोखा उपक्रम; नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन


भुसावळ (19 जून 2026) : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त रविवार, 21 जून रोजी भुसावळ येथे भव्य ‘योगोत्सव 2026’ चे आयोजन करण्यात आले आहे. अद्वैतानंद योगा अ‍ॅण्ड फिटनेस स्टुडिओ, द आर्ट ऑफ लिव्हिंग (भुसावळ) आणि प्रतिष्ठा महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावर्षीच्या योग दिनाची संकल्पना ‘योगा फॉर हेल्थ‘ अशी आहे.

भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने निर्धारित केलेल्या कॉमन योगा प्रोटोकॉलनुसार सामूहिक योगाभ्यास करण्यात येणार आहे. यासोबतच अद्वैतानंद शंखध्वनी ग्रुपच्या वतीने सामूहिक शंखनाद हा विशेष उपक्रमही राबविण्यात येणार आहे.




हा कार्यक्रम रविवार, 21 जून 2026 रोजी सकाळी 7 ते 8.30 या वेळेत रामानंद लॉन्स, रिंग रोड, जळगाव रोड, भुसावळ येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमासाठी प्रवेश सर्वांसाठी खुला असून पूर्णतः निःशुल्क आहे.

आयोजकांनी नागरिकांना आपल्या कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. वर्षभर विविध दिवस साजरे केले जातात, त्याचप्रमाणे स्वतःच्या आरोग्य आणि तंदुरुस्तीसाठीही एक दिवस योगासाठी समर्पित करण्याची गरज असल्याचे आयोजकांनी नमूद केले. एक तास योगासाठी देऊया आणि निरोगी जीवनाचा संकल्प करूया, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी देवेंद्र पाटील- 8805729473, कुणाल महाजन- 9823899377 व प्रा.डॉ.सीमा देवेंद्र – 7756042375 यांच्याशी संपर्क साधावा तसेच योगप्रेमी, नागरिक, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी या योगोत्सवात सहभागी होऊन आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करावा, असे आवाहन आयोजक संस्थांनी केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !