भुसावळातील होमगार्ड युनिटद्वारा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात
भुसावळ (21 जून 2026) : शहरातील होमगार्ड युनिट 12 तर्फे आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. होमगार्डचे जिल्हा समादेशक संदीपजी गावीत यांच्या नेतृत्वात तालुका समादेशक अधिकारी सुरेश किसन इंगळे, योग शिक्षिका प्रियंका मेहता यांनी याप्रसंगी योगाचे सादरीकरण करीत मार्गदर्शन केले.
योगाचे महत्व कवितेद्वारे सांगण्यात आले तर याप्रसंगी उपस्थितांनी विविध आसने केली. उपस्थितांनी योगाचे अनुभव सांगितले. सुरेखा इंगळे, नेहा करडे, प्रियंका शिरसाठ यांनी मनोगत व्यक्त केले. प्रज्ञा संत साधना सावळे, कल्पना वासनिक आदींची उपस्थिती होती. ऑफिस कर्मचारी अजय सुरवाडे व किरण राजपूत यांनी सहकार्य केले.




