भुसावळातील प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात


भुसावळ (21 जून 2026) : शहरातील श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात रविवार, 21 जून 2026 रोजी सकाळी आठ वाजता आंतरराष्ट्रीय योग दिवस महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

प्राध्यापकांनी केली योगासने
योग प्रशिक्षक संध्या सोनी यांनी प्रात्यक्षिके दाखवून सर्व प्राध्यापक-प्राध्यापकेतर कर्मचारी यांच्याकडून योगासन व प्राणायाम करून घेतले. धीरेंद्र सोनी यांनी योगाचे महत्व व आजच्या काळात त्याची उपयोगिता पूर्ण सभामंडपाला समजावून सांगितली. सूत्रसंचालन प्रा.व्ही.एस.खरे तर आभार निलेश गुरचळ यांनी मानले. या कार्यक्रमात प्रभारी प्राचार्य डॉ. मीना चौधरी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !