महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेत साकेगावातील श्री स्वामिनारायण गुरुकुलच्या विद्यार्थ्याला ‘सुवर्णपदक’
भुसावळ (24 जून 2026) : महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा (एमटीएस) जानेवारी 2026 रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेत साकेगावातील श्री स्वामिनारायण गुरुकुल विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय संपादन करीत शाळेच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवला. या परीक्षेत विद्यालयातील विद्यार्थी रुद्र राजेंद्र राणे याने सर्वाधिक गुण प्राप्त करून स्कूल गोल्ड मेडल पटकावले. इतर अनेक विद्यार्थ्यांनीही उत्कृष्ट यश मिळवून प्रमाणपत्रे प्राप्त केली.
विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव
विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे संचालक गोपाळ भगत यांनी विद्यार्थ्यांचा गौरव करीत त्यांच्या पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मुख्याध्यापक मनोज भोसले, अभिष सरोदे, मुख्याध्यापिका प्रणिता चौधरी, उज्वला धांडे यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

