भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात लायन्स क्लबतर्फे पुस्तकांचे वितरण
विकास पाचपांडे यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव
भुसावळ (27 जून 2026) : शहरातील लायन्स क्लब भुसावळतर्फे एक शैक्षणिक सेवाभावी उपक्रम म्हणून के. नारखेडे विद्यालयातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप शनिवार, 27 रोजी करण्यात आले. दरम्यान, विकास पाचपांडे यांचा वाढदिवस असल्याने त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
या उपक्रमाचा पुढाकार लायन्स क्लबचे एम.जे एफ. झोनल चेअरपर्सन प्रमोद नेमाडे यांच्यासमवेत लायन्स क्लबचे फाउंडर मेंबर व कॅबिनेट ऑफिसर गोपालजी अग्रवाल, लायन्स क्लबचे सेक्रेटरी लायन्स राजेश डी पाटील, क्लबचे ट्रेझरर राजेंद्र भदाणे, लायन्स क्लबचे सदस्य उमेश पाटील, लायन्स विनय बढे, झोनल चेअरपर्सन लायन्स किरण सरोदे, लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष विवेकानंदजी पाटील, सदस्य लायन्स शुभम पाटील यांच्या समवेत श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ भुसावळचे अध्यक्ष मकरंद नारखेडे, संस्थेचे सेक्रेटरी पी.व्ही.पाटील, संस्था सदस्य अर्चना नारखेडे, संस्था सदस्य विकास पाचपांडे, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अॅड.संगीता अडकमोल, संगणक विभाग प्रमुख बी.ए.पाटील, उपमुख्याध्यापक एस.पी.पाठक, विद्यालयाचे पर्यवेक्षक बी.बी.जोगी, विद्यालयाचे हेड क्लर्क मंगेश पाटील, एन.के.नारखेडे इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या अर्चना कोल्हे, तु.स.झोपे प्राथमिक विद्यामंदिराचे मुख्याध्यापक सुनील वानखेडे, पी.आर.पाटील, हंबर्डीकर पूर्व प्राथमिक विद्या मंदिराच्या मुख्याध्यापिका निलीमा पाटील आदींनी घेतला. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अॅड.संगीता अडकमोल यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन विद्यालयाचे उपशिक्षक शैलेंद्र वासकर यांनी केले.


