भुसावळात 23 हजार 737 बालकांना पल्स पोलिओचा लाभ
भुसावळ (28 जून 2026) : राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम अंतर्गत रविवार, 28 रोजी भुसावळ शहरातील एकूण 0 ते 5 वयोगटातील एकूण 24 हजार 562 बालकांपैकी 23 हजार 737 बालकांना तसेच पाच वर्षावरील 78 बालकांना पल्स पोलिओ डोस पाजण्यात आले.
या मोहिमेचा शुभारंभ रविवारी सकाळी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे व भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे, आरोग्य समिती सभापती मेघा वाणी यांच्याहस्ते करण्यात आला.


एकूण 87 बुथवर 239 कर्मचारी आणि 15 सुपरवारीयर्स यांनी मोहिम राबवली. जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका आरोग्याधिकारी डॉ.राजू तडवी, डॉ.किर्ती फलटणकर, डॉ.संदीप जैन, डॉ.तौसीफ खान, डॉ.अतिया खान, डॉ.अर्शिया शेख, डॉ.प्रियंका चिखले, डॉ.हेमंत शर्मा, डॉ.नृपाली सावकारे, डॉ.निता रॉय, डॉ.फरहीन शेख आदींनी मोहिम राबवली.
दरम्यान, उर्वरित बालकांना 30 जुन ते 4 जुलैदरम्यन घरोघरी जाऊन आरोग्य कर्मचारी लस देणार असल्याचे कळवण्यात आले आहे.
