भुसावळात वटपौर्णिमेनिमित्त आज सुवासिनींचा सन्मान
भुसावळ (29 जून 2026) : वटपौर्णिमेच्या निमित्ताने सुवासिनी महिलांचा सन्मान करण्यासाठी शहरात भाजपा गटनेता युवराज लोणारी व माजी नगरसेविका मीना युवराज लोणरी यांच्या माध्यमातून ‘सन्मान नारीशक्तीचा… जागर संस्कृतीचा…!’ या संकल्पनेतून उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात वटपूजेसाठी येणार्या प्रत्येक सुवासिनीचा भेटवस्तू देऊन गौरव करण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम सोमवार, 29 जून 2026 रोजी सकाळी 8.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत स्व.अटल बिहारी वाजपेयी नाना-नानी उद्यान, काशिराम नगर, भुसावळ येथे होणार आहे.


आयोजकांच्या माहितीनुसार, वटसावित्री पौर्णिमेच्या निमित्ताने भारतीय संस्कृतीतील स्त्रीशक्तीचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. वटपूजेसाठी येणार्या प्रत्येक सुवासिनीला सन्मानपूर्वक भेटवस्तू देण्यात येणार आहे. मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आयोजकांनी स्पष्ट केले आहे की, हा उपक्रम केवळ वटसावित्री पौर्णिमेनिमित्त पूजा करण्यासाठी येणार्या महिलांच्या सन्मानासाठी असून, पूजेसाठी आवश्यक असलेल्या ब्राह्मणांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
