वरणगावातील अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण नियमाकुल करणार : लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळेंची ग्वाही

मोफत फॉर्मचे वितरण : सर्व गरीब जनतेला मिळणार न्याय


Encroachments by occupants in Varangaon will be regularized: Assurance from directly elected Municipal Council President Sunil Kale वरणगाव (30 जून 2026) : वरणगाव शहरातील अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण नियमाकुल करण्यात येणार असल्याची ग्वाही लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांनी दिली. यावेळी घरकुल नियमाकुल करण्यासंदर्भातील मोफत फॉर्मचे नगपरिषदेच्या वतीने मोफत वितरण करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
उपनगराध्यक्षा अरुणा इंगळे, नगरसेविका माला मिलिंद मेढे, विरोधी पक्ष नेते तथा नगरसेवक नानाभाऊ चौधरी, सभापती श्रद्धा गायकवाड, भाग्यश्री सोनवणे, सभापती निलेश खाचणे, इरफान भाई, सय्यद अशपाक भाई शहा, विनोद झोपे, नगरसेविका तृप्ती महाजन, कामगार नेते मिलिंद मेढे, जनसेवक अजमल खान फजल शेख, शहराध्यक्ष सुनील माळी, आकाश निमकर, जनसेवक कुंदन माळी, तेजस जैन यांच्यासह अतिक्रमण धारक उपस्थित होते



31 जुलै पर्यंत फॉर्म भरून घेणार
गरीब जनतेला निवारा देण्याचे काम नगरपरिषदेतर्फे केले जाणार असून 31 जुलैपर्यंत फॉर्म भरून घेणार असल्याचे यावेळी नगराध्यक्ष सुनील काळे यावेळी म्हणाले. फॉर्म हे मोफत नगरपरिषदेतर्फे वितरीत केले जात आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !