शिष्यवृत्ती परीक्षेत साकेगावातील श्री स्वामिनारायण गुरुकुलचा पियुष कोळी ग्रामीणमधून प्रथम


भुसावळ (4 जुलै 2026) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने आयोजित पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवीत श्री स्वामिनारायण गुरुकुल विद्यालयातील पियुष विनोद कोळी याने यश संपादन करत भुसावळ तालुक्यातील ग्रामीण विभागात प्रथम येण्याचा मान पटकावला.

विद्यार्थ्यावर शुभेच्छांचा वर्षाव
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे संचालक गोपाळ भगत यांनी त्याचे अभिनंदन करून त्याच्या पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेला नवी उंची लाभली असून विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षा, गुणवत्ता आणि उत्कृष्टतेची प्रेरणा निर्माण झाली. याप्रसंगी मुख्याध्यापक मनोज भोसले, अभिष सरोदे, मुख्याध्यापिका प्रणिता चौधरी, उज्जवला धांडे यांनीही विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, व्यवस्थापन यांनी पियुष याचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्याच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !