यावल शहरात रंगली कुस्त्यांची दंगल : नामवंत मल्लांनी गाजवले मैदान
यावल (5 जुलै 2026) : यावल शहरातील सातोद रस्यावरील नदीपात्रात पेहरण ए शरीफ निमित्ताने भव्य कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रसह जम्मू कश्मीर, दिल्ली, उत्तर प्रदेश, गुजरात व मध्यप्रदेशातून आलेल्या नामवंत मल्लांनी मैदान चांगलेच गाजवले.
नागरिकांची केली गर्दी
कुस्तीची दंगल पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली तर काही लक्षवेधी कुस्त्या सायंकाळी दाखल झालेल्या पावसामुळे रद्द करण्यात आल्या. शहरात पेहरण ए शरीफच्या निमित्ताने बुधवारी सायंकाळी सातोद रस्त्यावर असलेल्या हडकाई नदीच्या पात्रात भव्य कुस्त्यांची खुली दंगल आयोजित करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
कुस्ती सामन्याचे उद्घाटन श्याम शास्त्री महाराज, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धनंजय चौधरी, यावलचे नगरसेवक अतुल पाटील, पराग सराफ यांच्याहस्ते करण्यात आले. प्रसंगी काँग्रेसचे शहराध्यक्ष मो.हकीम मो. याकुब, नगरसेवक निसार मोमीन, समीर खान, उमर कच्छी, पिंटू शेट, निलेश बारी, गोलु माळीसह आदींची उपस्थिती होती. या दंगल ए आममध्ये संपूर्ण महाराष्ट्रसह जम्मू-काश्मीर, दिल्ली, उत्तरप्रदेश, गुजरात, मध्य-प्रदेशातून नामवंत मल्ल दाखल झाले.
यात सायंकाळी पावसाचे वातावरण तयार झाले आणि रिपरिप पावसात देखील कुस्त्या या ठिकाणी सुरू होत्या मात्र अचानक पावसाने वेग वाढवल्याने मोठी दंगल कुस्ती ही मात्र आयोजकांना रद्द करावी लागली. कुस्तीच्या या स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या संख्येत नागरिकांनी गर्दी केली. दंगल ए आमच्या यशस्वीकरिता दंगल समितीचे अध्यक्ष शेख मजरोद्यीन, उपाध्यक्ष समीर खान, खजिनदार कलीमोद्यीन शेख, इकबाल पहेलवान, रफिक शेख नूर मोहम्मद खान, एजाजुद्दीन शेख असलम, नईम सुलेमानी, अल्तमस शेख, शेख गयासोद्यीन, सोनू शेख रफिक बाबू सह आदींनी परिश्रम घेतले.
कुस्तीत नामवंत मल्लांचा सहभाग
पेहरण ए शरीफ निमित्ताने बुधवारी आयोजित कुस्त्यांच्या या दंगलमध्ये जम्मू काश्मीरचे राशीद रूशी पहेलवान, वाशिमचे विजय वारा पहेलवान, दिल्ली येथील शमशाद पहेलवान, नांदेडचे साई पहेलवान, जम्मूतील जावेद पहेलवान, पुण्यातील गणेश काळे पहेलवान, बर्हाणपूरचे रेहान पहेलवान, सायगावचे गौरव निकम पहेलवान, उत्तर प्रदेशातील शहबाज कुरेशी पहेलवान तर खंडवा येथील राजेश कालरा पहेलवानसह नामवंत पहेलवानाची या ठिकाणी हजेरी लावली.
