वरणगावात अपर तहसील कार्यालय मंजूर करा : विभागीय आयुक्तांकडे नगराध्यक्ष सुनील काळेंची मागणी
वरणगाव (5 जुलै 2026) : 60 हजार लोकसंख्येच्या शहराला लागून अठ्ठावीस खेडे आहेत. ब्रिटिश काळात वरणगाव हे तालुक्याचे गाव होते मात्र आता वरणगाव शहर व परिसरातील नागरिकांना महसूलीची कामे करण्यासाठी 25 किलोमीटर फेर्याने जावे लागते. या त्रासातून सुटका मिळण्यासाठी वरणगाव शहरात अपर तहसील कार्यालय मंजूर करावे, अशी मागणी विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्याकडे वरणगावचे नगराध्यक्ष सुनील काळे यांनी भेटून केली.
वरणगाव हवे अपर तहसील कार्यालय
वरणगाव शहरातच का हवे अपर तहसील कार्यालय ? या सर्व बाबी विभागीय आयुक्तांच्या निदर्शनास यावेळी आणून देण्यात आल्या. जिल्हाधिकारी रोहन घुगे उपस्थित होते. या वेळी विभागीय आयुक्त यांनी जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव सरकारकडे पाठवण्याच्या सूचना दिल्या .

