प्रवाशांना दिलासा : मुंबई-नागपूर व नागपूर-नाशिक रोड दरम्यान अनारक्षित विशेष गाड्या धावणार


Unreserved special trains to run between Mumbai-Nagpur and Nagpur-Nashik भुसावळ (10 जुलै 2026) : मध्य रेल्वेने प्रवाशांच्या वाढीव गर्दीचा विचार करून उरुसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-नागपूर तसेच नागपूर-नाशिक रोड दरम्यान अनारक्षित विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते नागपूर अनारक्षित विशेष गाडी (दोन फेर्‍या)
गाडी क्रमांक 01021 विशेष अनारक्षित गाडी शनिवार, 11 जुलै 2026 रोजी छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून रात्री 12.30 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी नागपूर येथे दुपारी 3.45 वाजता पोहचेल.

गाडी क्रमांक 01022 विशेष अनारक्षित गाडी रविवार, जुलै 2026 रोजी नागपूर येथून 9.40 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे 1.50 वाजता पोहोचणार आहे.

या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावल, मलकापुर, शेगांव, अकोला, मूर्तिजापुर, बडनेरा, धामनगाव, वर्धा स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

नागपूर-नाशिक रोड अनारक्षित विशेष गाडी (दोन फेर्‍या)
गाडी क्रमांक 01203 विशेष अनारक्षित गाडी 12 जुलै 2026 रोजी नागपुर येथून 6.15 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी नाशिक रोड येथे 5.30 वाजता पोहोचणार आहे.

गाडी क्रमांक 01204 विशेष अनारक्षित 13 जुलै 2026 रोजी नाशिक रोड येथून 7.50 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी नागपूर येथे आठ वाजता पोहोचणार आहे.

या गाडीला अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगांव, धामणगाव, चांदुर, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव आणि मनमाड स्थानकावर थांबा असेल.

दोन्ही गाड्यांना 16 सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन सामान्य द्वितीय श्रेणी-सह गार्ड ब्रेक व्हॅन असेल.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !