यावल शहरात बाबा नगरात एसआयआर संदर्भात विशेष शिबिर


यावल (10 जुलै 2026) : यावल शहरातील बाबा नगरातील नुरानी मशिदीजवळ भागात महिला नगरसेविकांच्या वतीने एसआयआर संदर्भात विशेष शिबिर घेण्यात आले. यामध्ये या परिसरातील मतदारांची नोंदणी करण्यात आली. या शिबिरात बीएलओंना एकत्रीत बोलवण्यात आले आणि नागरिकांमध्ये एसआयआर संदर्भात जनजागृती करण्यात आली व नागरिकांचे आवश्यक कागदपत्र एकाच ठिकाणी जमा करून अर्ज करणे सोयीचे झाले आहे.

तीन दिवस शिबिर
शहरात बाबा नगर भागात नुराणी मस्जिद आहे. येथे यावल नगरपरिषदेच्या नगरसेविका शीला सोनवणे, नगरसेविका अमीना बी.शाकीर खान यांच्या माध्यमातून एस आय आर संदर्भात विशेष शिबिर घेण्यात येत आहे. गुरुवारपासून ते शनिवारपर्यंत तीन दिवस सदर शिबिर असून त्याची सुरुवात झाली आहे. याच भागात विविध ठिकाणी हे शिबिर घेतले जाणार आहे. शिबिरामध्ये मंडप टाकून बीएलओंना बसण्यासाठी व्यवस्था करण्यात येत आहे. मतदार याद्यांची उपलब्धता आणि एसआयआरसाठी मतदारांना काय-काय कागदपत्र लागतील या संदर्भात मार्गदर्शन करून नागरिकांचे एसआयआर संदर्भातील अर्ज भरण्यात येत आहे.

एकाच मंडपात आवश्यक ते सर्व कागदपत्र घेऊन बीएलओंकडे मतदार आल्यानंतर त्यांची योग्य माहिती एसआयआर फॉर्मच्या माध्यमातून भरली जात आहे. शहरातील विविध भागात एसआयआर संदर्भातील कार्यवाही वेळेत आणि पारदर्शकरित्या पार पाडली जावी यासाठी शिबिर आयोजित केल्याचे महिला नगरसेविकांनी सांगितले. या शिबिरासाठी तोफिक खान, इरफान खा, पिंटू शेठ सह आदींकडून परिश्रम घेतले जात आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !